Leena bhagwat biography sample


म्हणून मी लग्नानंतर नाव बदललं नाही... लीना भागवत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या- मला ती वाक्यच

Authored byपायल नाईक | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Mar 2024, 1:18 pm

Subscribe

Leena Bhagvat On Her Surname: लोकप्रिय अभिनेत्री लीना भागवत यांनी एका मुलाखतीत त्यांनी लग्नानंतर आपलं नाव का बदललं नाही याबद्दल सांगितलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई- अनेक मालिका आणि नाटकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. लीना आणि मंगेश खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत ही गोष्ट अनेकांना ठाऊक नव्हती. त्यांनी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतही नवरा बायकोची भूमिका साकारली होती. तर त्यांचं 'आमने सामने' हा नाटकही प्रचंड गाजलं.

ते दोघेही आता 'इवलेसे रोप' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे नाटक नात्याचे नवे अर्थ उलगडून सांगणार आहे. याच नाटकाच्या निमित्ताने लीना यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे.

Kevin oneal actor biography

लीना यांनी या मुलाखतीत त्यांनी लग्नानंतर नाव का बदललं नाही याबद्दल सांगितलं आहे.

मीडिया टॉल्क मराठी या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांना यांच्या नावाबद्दल विचारणा करण्यात आली. लग्न झाल्यावरही तुम्ही नाव बदललं नाही आणि तेव्हा तुम्हाला काय काय ऐकून घ्यावं लागलं असं विचारताच लीना म्हणाल्या, 'मला ही वाक्य लोकांची ऐकूच येत नाहीत.

मी जसं बोलले की मी जास्त लोकांमध्ये मिसळायला जात नाही. त्यामुळे कधीकधी ते बरं पडतं. कारण मी हे कधी ऐकलंच नाही. मुळात मी माझं नाव काय ठेवायचं हे इतर लोक कशाला ठरवतील. ते आम्ही दोघे ठरवू ना. आणि जर तुम्हालाच रस्त्यावर कुणी विचारलं अचानक एक दिवस, तुझ्या डोक्यात वेगळाच विचार सुरू आहे. आणि तुला विचारलं की तू लीना भागवतला ओळखतेस का?

तू म्हणशील हो. पण तेच तुला विचारलं तू लीना कदमला ओळखतेस का? तू म्हणशील नाही.'


पुढे लीना म्हणाल्या, 'मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं ते नाव आहे. मंगेशला त्या नावाविषयी आदर आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तारा बाकी लोकांचा विचार करायचा प्रश्न येतोच कुठे.' त्यावर मंगेश म्हणतात, 'मी त्या व्यक्तीच्या नावावर आणि त्या व्यक्तीच्या कामावर खुश झालो होतो.

मग मी त्या व्यक्तीचं नाव कशाला बदलू?' त्यांचं 'इवलेसे रोप' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

लेखकाबद्दलपायल नाईकपायल नाईक, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. कृषीवल, इ-सकाळ, हिंदुस्तान टाइम्स मराठी सह ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव.

सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा